नाना पाटेकर – सच्चा कलावंत ते सच्चा माणूस

प्रेरणादायी मनोरंजन महाराष्ट्र सामान्य ज्ञान

विश्वनाथ’ नावाचा लौकीकार्थाने देखणा नसलेला एक सर्वसामान्य माणूस. पहिल्यांदा बघताक्षणी नजरेत भरण्यासारखं काहीच नाही त्या माणसामध्ये. पण त्याच्यातील जिद्द, चिकाटी, मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांनी त्याने त्याचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. ‘जमिनीवर उगवून आकाशापर्यंत पोहचलेला आणि तरीही मुळाशी घट्ट बांधून राहिलेला’ तो विश्वनाथ म्हणजेच आपला सर्वांचा लाडका ‘नाना पाटेकर’. ज्याचे नाव ऐकताच त्याच्या अनेक मराठी-हिंदी चित्रपटातील नायक, खलनायक, सहनायक, चरित्रनायक, शेतकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणारा ‘नाम फाऊंडेशन’चा संस्थापक, सीमेवरील जवानांसाठी पोटतिडकीने बोलणारा नाना अशी अनेक रूपे आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातात.

 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे १ जानेवारी १९५१ या दिवशी दिनकर आणि संजनाबाई पाटेकर या दाम्पत्याच्या पोटी नाना पाटेकरांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ‘कष्ट’ हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. जे.जे.स्कूल ऑफ आर्टस् मधून शिक्षण पूर्ण केलेल्या नानांना स्केचेस बनवण्याचा छंद होता. आपल्या कॉलेजच्या काळात ते पोलिसांना गुन्हेगारांची छायाचित्रे रेखाटून देत असत. याच काळात त्यांनी कॉलेजच्या नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली.

१९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून नानांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका एवढी लहान होती की ते कोणाच्या लक्षातही आले नाहीत. यापुढील आठ वर्षांत त्यांनी गिद्ध, भालू, शीला अशा मिळेल त्या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. यापैकी कोणताही चित्रपट म्हणावी तशी कमाई करू शकला नाही आणि नानांचा संघर्षही कमी झाला नाही. याच दरम्यान त्यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये तसेच ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकातही काम केले. या भूमिकेला यश मिळाले.

१९८४ साली राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ या चित्रपटात त्यांनी सहनायकाची भूमिका केली. यातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले परंतु चित्रपट पडला. १९८६ साली आलेल्या ‘अंकुश’ चित्रपटात एका बेकारीने त्रस्त झालेल्या युवकाची भूमिका नानांनी वठवली. ही भूमिका अजरामर ठरली. याच वर्षी एका वास्तव घटनेवर आधारित ‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट आला. हा चित्रपट यशस्वी ठरला तो त्यात नानांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकेमुळे. त्यानंतर १९८७ साली एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’ या चित्रपटातील नानांची लहानशी भूमिकाही लोकांना भावली. १९८९ मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांनी केलेल्या खलनायकाच्या भूमिकेला तुफान यश मिळाले.

‘प्रहार’ या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. यात त्यांनी भारतीय सैनिकाची भूमिकाही साकारली होती. या भूमिकेसाठी नाना तीन महिने पुण्याला जाऊन सैनिकांसोबत राहिले आणि ट्रेनिंगही घेतली. जेणेकरून कमांडोची भूमिका अधिक वास्तवदर्शी व्हावी. १९९३ च्या ‘तिरंगा’ चित्रपटात ते राजकुमार सारख्या जुन्याजाणत्या अभिनेत्यासमोर उभे राहिले. तोडीस तोड केलेल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी राजकुमार समोर आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका वेगळी असते. क्रांतीवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, पक पक पकाक्, खामोशी – म्युझिकल ही त्याची खास उदाहरणे. पण असे अनेक चित्रपट आहेत जे नानांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केले. त्यात खास उल्लेख करावा असे चित्रपट म्हणजे २०१४ साली आलेला ‘प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ आणि २०१६ साली आलेला नटसम्राट. यातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. या चित्रपटांतील भूमिकांद्वारे नानांनी अभिनयाचे शिखर गाठले असेच म्हणावे लागेल. यशाची ही मालिका निरंतर सुरूच आहे.

लावंत म्हणून महान असणारा नाना माणूस म्हणून किती संवेदनशील आहे, हे आपल्याला त्याच्या ‘नाम फाऊंडेशन’च्या कामामधून कळतं. मकरंद अनासपुरेंसोबत स्थापन केलेली ही संस्था दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करते. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर

नेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या नानांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पण खरे सांगायचे तर नानांसारख्या कलांवताला आपण पुरस्कारांच्या मोजपट्टीत मोजूच शकत नाही. फिल्म इंडस्ट्रीसारख्या मोहमयी जगात राहूनही सगळ्या मोहाच्या पलीकडे असलेले नाना एखाद्या ‘योग्या’ प्रमाणे आयुष्य जगत आहेत.

Source : https://www.marathikidaa.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *