एक अधुरी प्रेम कहाणी….नक्की वाचा

Love

एक प्रेम त्रिकोण आणि अधुरी प्रेम कहाणी…..नमस्कार मित्रानो आज तुमच्यासमोर मी एक लव स्टोरी मांडतोय,जी सध्या सुरु आहे..

पूर्ण वाचून तुम्हाला काय वाटते हे नक्की कळवा…..

नोट-लव स्टोरी मध्ये वापरलेली नाव ही काल्पनिक आहेत,खरी नाव टाकू शकत नाही….

या प्रेमकथेला सुरुवात झाली ती सागर आणि स्नेहल च्या शालेय जीवनात.सागर आणि स्नेहल एकाच वर्गात शिकत होते,७ वी ला असताना सागर ला स्नेहल आवडायला लागली.पण तो फक्त वर्गात तिच्याकडे पहायचा,रोज पहायचा.तिला बहुधा ते समजल होत कि सागर तिच्याकडे का आणि कस पाहतोय.७ वी गेली,८ वी गेली,९ वी गेली आणि १० वी सुद्धा.पण हा तिला कधीच बोलला नाही.फक्त आणि फक्त तिला पाहत राहायचा.शाळा सुटल्यावर तिच्या नकळत सायकल वर तिचा तिच्या घरापर्यंत पाठलाग करणे काय तो इतकाच पराक्रम केला याने.ती फक्त त्याला शाळेत दिसायची आणि तिला पाहिलं कि त्याचा दिवस खूप सुंदर जायचा,हे ४ वर्ष सागर ने तिच्यावर प्रेम केल ते फक्त आणि फक्त नजरेतूनच….
दोघांची १० वी झाली या नजरेतील प्रेमकथेला स्वल्पविराम मिळाला…कदाचित तो पूर्णविराम सुद्धा ठरू शकेल अस पण वाटले सागर ला.१० वी नंतर च्या शिक्षणसाठी सागर शहर सोडून दुसर्या शहरात गेला तर स्नेहल आहे तिथेच राहिली.११ वी १२ वी झाली पण तरीही सागर ला स्नेहल काही दिसली नाही…
स्नेहल कोणत्या कोलेज मध्ये आहे हे जाणून माहित करून घ्यायचा प्रयत्न केला,बस माहिती भेटली इथ इथ आहे.तिच्यामागे सध्या कोण कोण लागलेला आहे.ऐकून शांत बसण्याशिवाय त्यावेळी तर सागर कडे काही पर्याय नव्हता..

१२ वी झाली पुढच्या पदवी शिक्षणासाठी दोघेही पुण्याला गेले,हे सागर ला मित्राकडून समजले कि स्नेहल पण पुण्यातच आहे,पण सागर ला वाटायचे कि आता तर पुलाखालून बरंच पाणी गेल असेल,मी तिच्या नजरेत कसा आणि काय असेल ? ती मला बोलेल का ? असे एक न अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते.
पण प्रेम केल होत ना,राहून राहून ती मनात यायची.एका शाळेतल्या मित्राकडून त्याने ती कोणत्या कॉलेज मध्ये आहे हे माहित करून घेतल.तिला फेसबुक वर शोधलं,पण ती सोशल मीडिया जास्त वापरत नसल्यामुळे तिथून त्याला तिला भेटन,बोलन शक्य झाल नाही.
तो एक आशेचा किरण होता तोही संपला…
अखेर १० वी नंतर ५ वर्षांनी नियतीच्या मनात होत म्हणून सागर स्नेहल ला बोलू शकला.
त्यांच्या शाळेतल्या वर्गमित्रांचा एक whatsapp ग्रुप बनवला गेला त्यात हे दोघ add झाले..सागर तिला ग्रुप मध्ये पाहून मनोमन खुश झाला..
पण तरीही मनात तीच धाकधूक होती,आता योग्य वेळ असेल का तिला बोलायची ?? परत सगळ्या त्याच प्रश्नच वादळ मनात यायचं आणि तो थांबायचा..अखेर hi या मेसेज पासून त्याने तिला बोलायला सुरुवात केली..बोलन वाढत गेल.पण सागर काही त्या मुद्द्यवर येत नव्हता.तिला माहित होत की तो तिच्यावर प्रेम करतो.पण तो बोलत काही नव्हता….
१० मिनिटांची त्यांची Chating काही तासांवर गेली होती.अखेर तिने त्याला एक प्रश्न केला.. तू मला शाळेत Like करायचास का ?????
बस तिने इथून सागर ला बोलत केल,जे कि बोलण्यास तो धजावत नव्हता..
ती म्हणली सांग कि रे तुझ्या तरी मनातल…न राहवून सागर ने त्याच्या भावना तिला बोलून दाखवल्या…..
त्यावर ती म्हणली Sorry मी तुझ्या feelings Hurt केल्याबद्दल..त्यावेळी सागर ने मोठ्या मनाणे ते पचवल.
एके दिवशी ती म्हणली मला Bf आहे,हे ऐकून सागर आतल्या आत खूप खचला आणि वाईट पण वाटल..तरीही मनातलं मनात ठेवून पुढे तिच्याशी बोलला…
तिने सांगितल १२ वी ला मला केतन ने प्रपोज केल.सागर शी बोलताना ति नकळत सागर मध्ये गुंतत होती.आणि मनातल खूप काही बोलून जात होती..

सागर शी बोलताना ती म्हणली ‘बेकार आहे रे माझी लव स्टोरी’..
हे सगळ सुरु असताना देखील सागर ने तिला प्रपोज नाही केल.
पण दिवसेंदिवस ती सागर मध्ये गुंतत चालली होती हे मात्र नक्की,आपसूकच या परिस्थितीची कुणकुण केतन ला लागली असेल.
आता ज्याच्यासोबत स्नेहल ५ वर्ष बोलते आहे त्याला ती सर्व काही सांगत असणार.मग हेच झाल.सागर शी मी बोलते आहे,तो कोण,कसा आणि काय आहे हे तिने केतन ला सांगून टाकल.
सागर ला अशी अपेक्षा नव्हती कि त्याने ज्या गोष्टी स्नेहल सोबत मोकळेपणाने शेयर केल्या त्या तिने दुसऱ्या कोणाशी कराव्या…
पण तिने ते केल आणि सागर आणि केतन च बोलण्यातून भांडण झाल.
तिने त्यावेळी पूर्ण बाजू hi केतन ची घेतली आणि सागर ला सोयीस्करपणे दूर केल..
सागर चे call ब्लॉक केले,त्याला Whastsapp,फेसबुक ला ब्लॉक केल.थोडक्यात सागर चे स्नेहल पर्यंत जाण्याचे सर्व रस्ते बंद केले.
हे घडल ते सर्व अचानक आणि अशा वेळी जेंव्हा कि सागर आणि स्नेहल चांगल्या पद्धतीने बोलत होते.पण नजर लागली आणि सगळ उलट झाल.
त्यानंतर जवळपास ८ महिने सागर तिला फक्त आणि फक्त Text मेसेज करायचा.ज्याचा त्याला शून्य reply यायचा..
८ महिने सतत मेसेज करून स्नेहल चा कसलाच reply नव्हता.सागर तिला दुसऱ्या अनेक नंबर वरून call करू शकत होता,पण त्याने ते नाही केल.तिला परेशान करणे हा त्याचा हेतूच नव्हता.
हे ८ महिने सागर च्या नशिबी फक्त तिची वाट पाहण्यात गेले,कि हो आज नाही तर उद्या त्याला ती बोलेल.
२०१६ वर्ष तिची वाट पाहण्यात सरल..
२०१७ उजाडल आणि स्नेहल ने सागर ला whatsapp वर Unblock केल.
बस सागर साठी तो दिवस किती आनंदाचा होता हे तुम्ही समजू शकता.
सागर तिला बोलायचा प्रयत्न करायचा पण ती त्याला सारख टाळायची.थोडक्यात बोलून शांत व्हायची.त्यानंतर सुद्धा २,३ वेळेस तिने त्याला ब्लॉक केला.परत काढल…
परत बोलत,बोलत स्नेहल सागर सोबत बोलती झाली…
सागर ने ८,१० वर्ष काढले पण दुसरी मुलगी नाही पहिली.त्यालाही माहित नाही पण ट खूप प्रेम करतो तिच्यावर.
२०१६ मध्ये ते दोघ भेटणार होते,पण सागर च्या नशिबात तेंव्हा तीच भेटन नव्हतच..ती उत्सुक होती भेटायला आणि हा पण.पण काही कारणामुळे ते शक्य झाल नाही.ती त्यावेळी शेवटी बोलून जाताना म्हणली होती कि,मी तुला कधीच बोलणार आणि भेटणार नाही.हे ऐकून सुद्धा सागर तिच्या आशेवर राहिला.
कदाचित सागर ला त्याच्या प्रेमावर विश्वास असावा.
फेब्रुवारी मध्ये सागर तिला बोलला कि पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये तुला जसा वेळ असेल तस भेट.त्यावर स्नेहल म्हणली बघुया.

सागर च्या मनात कुठेतरी एक आशा होती कि यार ही मला काही क्षणापुरती का होईना पण भेटेल.
अखेर १५ मार्च नंतर तिने भेटायला ये सांगितले.
बस तो दिवस म्हणजे सागर साठी सोन्याचा दिवस,सण असतो तसा आनंद झालेला त्याला.
गेला भेटला.काय बोलाव आणि काय नाही अस झालेलं,ती बोलत गेली आणि तो ऐकत गेला..
भेटण्याअगोदर सागर ला वाटलेला आता या परिस्थिती वरून तरी त्या दोघांची भेट हे अर्धा तासाचा पुढे जाईल,पण प्रत्यक्षात ते ४ तास सोबत होते…
बस झाली भेट…….
त्यानंतर बरोबर एक महिन्याने सागर ने तिला भेटशील का अस विचारल ?
त्यावर ती आधी नाही म्हणली पण नंतर भेटली…
सागर तिला लॉंग ड्राईव ला घेऊन गेला,तिला आवडल ते….
मार्च पासून २ महिन्यात सागर आणि स्नेहल ४ ते ५ वेळेस भेटले.
आता यामध्ये केतन हा आलाच ना,त्याला लक्षात आल कि स्नेहल सागर सोबत भेटते,फिरते,मूवी ला जाते.
त्याला सागर च्या या २ महिन्यांच्या सोबतीची भीती कि स्नेहल त्याला सोडून जाईल.
तो तिला Emotinal बोलून बोलून Confuse करतो.कि तू सागर चीच आहेस आता,मी तुमच्या दोघांमध्ये येत नाही वगेरे,वगेरे…..
सागर ला माहिती कि स्नेहल केतन किती बोलते.हेही माहिती कि सागर पेक्षा जास्त वेळ हा केतन ला बोलण्यात देत्ते.तरीही सागर आहेच ठाम त्याच्या प्रेमावर.त्याला या गोष्टींची भीती वाटली पण नाही आणि वाटत पण नाही कि केतन च्या असण्याने त्याच्या स्नेहल वर असलेल्या प्रेमावर काही फरक पडेल…
सागर ची सोबत स्नेहल ला फक्त ४ ते ५ महिन्यांची आहे आणि केतन ची ५ वर्षांची.
स्नेहल द्विधा मनस्थिती मध्ये आहे सध्या.सागर आणि केतन मुळे.
पण अजूनही सागर ने तिला प्रपोज केलेलं नाहीय.
ती म्हणते जे केतन ला जे ५ वर्षात जमल नाही ते सागर ने २ महिन्यात तिच्यासाठी केल.
तिला सागर च भेटण,तिच्यावर कविता करण,तिला फिरायला घेऊन जान हे आवडल.
कारण ५ वर्षात केतन ते नाही करू शकला.प्रेम तर तोही करतोच अस ती म्हणते.

एकूण २ महिन्यात ती सागर मध्ये भरपूर गुंतली आहे आणि गुंतत चालली आहे.हे तिला समजतंय पण जे होतय ते नकळत होतय हेही ती स्पष्ट करते.
जर केतन च आणि तीच खर प्रेम असत तर ती २ महिन्यात सागर कडे कशी वळली गेली ??
सागर प्रेम खूप करतो..
केतन पण करत असेल..
पण तिच्यासाठी कोण योग्य आहे ??
सागर का केतन ???
सागर ला व्यक्त व्हायला खूप कमी वेळ भेटला ज्याच्या तुलनेत केतन कडे खूप वेळ होता.
मग केतन चा प्रेम कमकुवत असेल का ?
स्नेहल ची द्विधा मनस्थिती २ महिन्यात कशी बदलू शकते ?
मित्रानो तुम्हाला काय वाटत ?
स्नेहल साठी योग्य कोण आहे ?
पूर्ण वाचून नक्की सांगा…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *