सुंदर आणि सालस अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Marathi

मराठी मालिकांच्या लोकप्रिय सुंदर आणि सालस अभिनेत्रींमध्ये आवर्जून नाव घ्यावं लागेल ती अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं. प्राजक्ताची नवा चित्रपट हम्पी प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याआधीची ‘जुळून येती रेशीम गाठी’ ही मालिकाही चांगलीच गाजली होती. यातील प्राजक्ताच्या कामाचं चांगलंच कौतुक केलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा ती या मालिकेतील वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे.

मुळची पुण्याची असलेली प्राजक्ता ही जास्त अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असली तरी ती एक उत्तम विशारद क्लासिकल डान्सर आहे. अनेक स्टेज शोमध्ये तिने परफॉर्मन्स दिला आहे. खूप लहान असतानापासून ती भरतनाटयम शिकत आहे. आजही ती अनेक कार्यक्रमांमध्ये डान्स करताना बघायला मिळते. प्राजक्ता जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर ती अभिनेत्री आणि तितकीच सुंदर ती एक डान्सर आहे. चला अधिक जाणून घेऊया प्राजक्ताबद्दल आणखीन काही…

* प्राजक्ता ही मुळची पुण्याची आहे. पण आता ती मुंबईत राहते. आणि जन्मतारीख ८ ऑगस्ट १९८९ आहे.
* प्राजक्ताने पहिल्यांदा सिनेमात काम केलं ते २०१३ मध्ये आलेल्या ‘खो खो’ या सिनेमातून. त्यानंतर आणखी काही सिनेमात तिने काम केलं आहे.

* प्राजक्ता ही एक उत्तम क्लासिकल डान्सर असून ती वयाच्या ७व्या वर्षापासून क्लासिकल डान्स शिकते. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून ती विशारद आहे.
* प्राजक्ताने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे येथील ललीत कला केंद्र येथून केलं आहे. इतकच काय तर ती युनिव्हर्सिटी टॉपर होती.

* २००८ पासून तिने पुणे नवरात्री फेस्टिव्हल, पुणे फेस्टिव्हल, शनिवार वाडा फेस्टिव्हल आणि पुणे पोलीस कर्तव्य मेळावा या कार्यक्रमातून सादरीकरण केलं आहे.

* प्राजक्ताने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तो डीडी वाहिनीवर आलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ मधून. त्यावेळी प्राजक्ता ६व्या वर्गात शिकत होती.

 

* प्राजक्ताने आतापर्यंत सुगरण, गाणे तुमचे आमचे, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, फिरूनी नवीन जन्मेन मी, या कार्यक्रमांमधून आणि बंध रेशमाचे, सुवासिनी, जुळून येती रेशीम गाठी आणि नकटीच्या लग्नाला यायचं हं…’ या मालिकांमधून कामे केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *