हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, दरवर्षी वाढते लांबी

OMG

भगवान शिव म्हणजेच शंकराची पूजाही मूर्तीरुपात होत नाही तर त्यांची पूजा ही शिवलिंग या रूपा मध्ये केली जाते. प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये एकतरी मंदिर असते ज्यामध्ये शिवलिंग असते. पण जेथे सर्व शिवलिंग आकारात छोटे होत चालले आहेत तेथे एक असेही शिवलिंग आहे जे दरवर्षी आकाराने मोठे होत आहे. आज आम्ही अश्याच दरवर्षी मोठे होणाऱ्या शिवलिंगाची माहीती देत आहोत जे जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे आणि ते दरवर्षी मोठे होत आहे.

हे शिवलिंग छत्तीसगडच्या गरीयाबंद जिल्ह्यात भूतेश्वरनाथ आहे. नैसर्गिक पणे तयार झालेले हे शिवलिंग जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे.

हे जमिनी पासून जवळपास 18 फुट उंच आणि आहे 20 फुट गोलाकार आहे. राजस्व विभागा तर्फे दरवर्षी याची उंची मोजली जाते ज्यामध्ये हे दरवर्षी 6 ते 8 इंच वाढल्याचे दिसून येते.

काय आहे मान्यता

मेन शहरा पासून 3 किलोमीटर दूर जंगला मध्ये असलेले हे शिवलिंग मरौदा गावात आहे.

12 ज्योतिर्लिंग प्रमाणे यालाही अर्धनारीश्वर शिवलिंग म्हणून मान्यता आहे.

याबद्दल गोष्ट अशी आहे की अनेक वर्षा पूर्वी पारागांव निवासी जमीनदार शोभा सिंह यांची येथे शेती होती. शोभा सिंह जेव्हा संध्याकाळी आपल्या शेतात फिरायला जात असते तेव्हा त्यांना एका टेकडीवर बैलाच्या ओरडण्याचा आणि वाघाच्या डरकाळीचा आवाज येत असे. सुरुवातीला त्यांना असे वाटले की हा त्यांना होणारा भास आहे. पण अनेक वेळा असा आवाज ऐकल्या नंतर त्यांनी गावातील लोकांना याबद्दल सांगितले.

गावातील लोकांनी देखील टेकडीवर असा आवाज ऐकला होता. त्यानंतर लोकांनी आजूबाजूला बैलाची आणि वाघाची शोधाशोध केली. पण त्यांना कोठेही हे प्राणी नाही भेटले.

या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी दरवर्षी शेकडोच्या संखेत लोक कावड घेऊन पायी यात्रा करून येथे येतात. येथे येणाऱ्या भक्तांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

या शिवलिंगाला जगातील सर्वात मोठा शिवलिंग असल्याचा मान आहे.

पहिले ही टेकडी लहान होती पण हळूहळू हिचा आकार आणि गोलाकार वाढत गेला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *