विराट अनुष्काचे लग्न जा ठिकाणी झाले त्या ठिकाणाचे भाडे पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

Love

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीत टस्कनी मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांनी ह्याची बातमी ट्विटरवर लग्नाचे फोटोज टाकून उघड केली. इटली मध्य लग्न त्याच ठिकाणी झाले जिथे मे २०१७ ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांचे कुटुंब हॉलिडे साजरे करण्यास आले होते. विराट अनुष्का ने टस्कनी शहराच्या बोर्गो फिनॉसिटॉ (Borgo Finocchieto) रिसॉर्ट मध्ये लग्न केले.

हा रिसॉर्ट मिलान शहराच्या जवळ ४-५ तासाच्या अंतरावर आहे. हि जागा ८०० वर्ष जुन्या एका गावाचे पुनर्विकास करून बनवली गेली आहे. ह्या गावाला संपूर्ण रित्या नवीन लूक देऊन आता इथे विवाहसोहळे पार पाडतात. इथे मे २०१७ ला अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल आपल्या इटली व्हॅकेशन दरम्यान थांबले होते.

बोर्गो फिनोखिएतो हे रिसोर्ट दुनियेतील दुसऱ्या क्रमांकाचं महागड हॉटेल बनतं. हे हॉटेल ख्रिसमस आणि न्यू इयरच्या दरम्यान एका आठवड्याचा खर्च जवळपास १ कोटी रुपये  आकारतो. जर प्रत्येक दिवसाची किंमत मोजली तर ह्या हॉटेल मधील एका सुटची एका दिवसाची किंमत जवळपास १४ लाख रुपये आहे. सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत  बोर्गो फिनोखिएतोमध्ये सुट्स उपलब्ध आहेत. ज्या गावाला जॉन फिलिप यांनी नवं रूप दिलं व तेथे हे अलिशान रेसॉर्ट उभं केलं आहे. फ्लोरेंस एअरपोर्टपासून बोर्गो फिनोखिएतो जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. या अलिशान रेसॉर्टमध्ये सगळ्या लक्झरीयस सोयी सुविधा आहे. ओवल स्विमिंग पूल, जिम, स्पा, टेनिस कोर्ट सगळ्याच सुविधा तेथे आहेत.

विराट अनुष्काच्या लग्नाच्या वेळी हॉटेलच्या चारही बाजूने कडक सुरक्षा व्यवस्था होती. निमंत्रण पत्रिका घेऊन येणाऱ्या पाहुण्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात होतं.

६ एकर मध्ये बनलेल्या ह्या रिसॉर्ट मध्ये २२ खोल्या आहेत, ज्यामध्ये एका वेळी फक्त ४४ लोकं चा थांबू शकतात. बोललं जात आहे कि विराट आणि अनुष्का च्या लग्नाची गेस्ट लिस्ट लिस्ट सुद्धा खूप छोटी होती. ह्या रिसॉर्टचे सर्व ५ वीला मध्ये एका आठवडा थांबण्याचे खर्च जवळपास ८ करोड रुपयांपेक्षा सुद्धा जास्त आहे. फोर्ब्स च्या लिस्ट नुसार हे जगातील सर्वात टॉप २० महागड्या लग्जरी रिसॉर्ट पैकी एक आहे.

विराट अनुष्काच्या लग्नाचे फोटोज :

गेल्या आठ्वड्यापासून विराट अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. पण विराट अनुष्का ह्या दोघांपैकी कोणीच लग्नाची बातमी जाहीर केली नव्हती. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या बोलण्यावर जवळपास विश्वासच नव्हता कोणाचा. परंतु सोमवारी दिनांक ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट आणि अनुष्का ह्यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंट वर लग्नाचे फोटोज ट्विट करून सर्वांना आश्चर्याचा गोड धक्का दिला. विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले आणि त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशिअल मीडियावर तासाभरातच वायरल सुद्धा झाले. अनेकांनी शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ते क्रिकेटर हरभजन सिंग सर्वांनी ह्या नवविवाहित दांपंत्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. क्रिकेट चाहत्यांनी सुद्धा भरभरून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीला शुभेच्छा दिल्या. हा हि गोष्ट वेगळी आहे कि लाखों तरुणींच्या ह्रदयातील धडकन असलेल्या विराटने लग्नाबद्दल कोणतीहि बातमी जाहीर न करता अचानक लग्नाचे फोटोज टाकल्यामुळे तरुणींचे हृदय तुटले असेल, त्यांनी तसे फोटोज वर कमेंट सुद्धा केल्या आहेत.

खूप वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधाराला शेवटी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने बोल्ड केलेच. विराट आणि अनुष्का शेवटी ‘विरुष्का’ झाले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने  इटलीत एका खाजगी समारंभात विवाहसोहळा पार पाडला. दोघांनाही लग्नाची बातमी एकदम गुपित ठेवायची होती. ह्याशिवाय समारंभात नातेवाइकांशिवाय फक्त काही मित्रमंडळीच होते.

दोघांचे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार झाले. ह्यात लोकप्रिय कॉस्ट्यूम डिझायनर सब्यसाची मुखर्जी ह्यांनी नवरदेव साठी कपडे डिजाईन केले होते. भारतात परतल्यावर २१ डिसेंबर ला विराट अनुष्काचे रिसेप्शन असेल. ह्यानंतर २६ डिसेंबर ला मुंबईत एक शानदार पार्टी असेल, जिथे सिनेजगतातील कलाकार मंडळी आणि क्रिकेटजगतातील मंडळी जमा होतील.

काही दिवसा अगोदरच विराट आणि अनुष्का इटलीत गेले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. परंतु विराट किंवा अनुष्का ह्या दोघांनीही ह्या गोष्टीचा कुठलाच खुलासा केला नव्हता. दोघांनाही लग्न होईपर्यंत हि गोष्ट गुपितच ठेवायची होती.

लग्नात अनुष्का ने गोल्डन कलर चा लेहंगा आणि विराट ने गोल्डन कलरची शेरवानी घातली होती. दोघांचे लग्न इटलीत एका खाजगी समारंभात पार पाडले. चला तर ह्या नवविवाहित दाम्पत्यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊया.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *