देशातील प्रसिध्द तरुण राजकारणी आणि त्यांच्या प्रेमकहाणी,पहा आपल्या मुख्यमंत्रांच्या लग्नाची कहाणी.

Love

असं म्हणतात की, प्रेमाच्या वाटेवर काटे अधिक आणि फुलं कमी असतात. तसेच ज्याला कुणाला प्रेम होतं त्या व्यक्तीचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून जातं. प्रत्येकालाच कधी ना कधी कुणाशीतरी प्रेम होतं मग ती व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब. प्रेमासमोर सर्वकाही सारखंच असतं. आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या प्रेम कहाण्या पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रेम कहाण्या सांगणार आहोत ज्या अगदी एखाद्या सिनेमातील असाव्यात अशाच काही आहेत.

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी कुणालाही आणि कधीही होऊ शकते. मग, ती व्यक्ती सर्वसामान्य असो, सेलेब्रिटी असो किंवा राजकारणी. सेलेब्रिटींच्या लव्ह स्टोरीज तुम्हाला माहिती असतीलच पण आज आम्ही तुम्हाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रेम कहाण्यांसंदर्भात काही सांगणार आहोत. होय, आपल्या देशातील राजकारणी हे सर्व सामांन्यांसाठी भले ही खास असो मात्र, त्यांच्या लव्ह स्टोरीज या सामान्य माणसांप्रमाणेच आहेत. पाहूयात अशाच काही लव्ह स्टोरीज…

देवेंद्र फडणवीस आणि अमृता

देवेंद्र फडणवीस हे वयाच्या केवळ २७ व्या वर्षी महापौर बनले होते. त्यावेळी ते देशातील सर्वात तरूण महापौर ठरले होते. महाराष्ट्रात भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनण्याचा मानही त्यांनी मिळवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांची प्रेमकहाणी खास आहे.

अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर देवेंद्र आणि अमृता यांनी आणखी दोन-तीनवेळा भेटले. या भेटीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबर २००५ रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले आणि अमृता देवेंद्र यांच्या धरमपेठेतील घरी सून म्हणून आल्या.

अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आतापर्यंत महाराष्‍ट्रातील कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या पत्नीने नोकरी केलेली नाही. मात्र, अमृता फडणवीस त्याला अपवाद ठरल्‍या.

अभिनेत्री प्रियंका चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘जय गंगाजल’ या सिनेमामध्ये अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. हे गाणं सिनेमात अनेक ठिकाणी बॅकग्राऊंड साँगच्या रुपात वापरण्‍यात आलं आहे. यासोबत अमृता यांनी बॉलिवूडमध्ये आपली इन्ट्री केली.

सचिन पायलट आणि सारा

प्रेम करणारे दोन वेगवेग्‍ळ्या जाती-धर्मांचे असतील तर त्‍यांना विरोध करणारे जास्‍त असतात. मात्र, खरे प्रेम असेल तर त्‍याला कुणीही थांबवू शकत नाही. तुमच्या प्रेमात खरेपणा आणि ताकद असल्यास कुठलंही बंधन एखाद्या कच्चा धाग्याप्रमाणे मोडलं जाऊ शकत. याचेच उदाहरण म्हणजे सचिन पायलट यांचे.

राजस्थानमधील राजकीय घराण्यातील सचिन पायलट आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेते फारुक अब्दुल्ला यांची मुलगी सारा या दोघांची लव्हस्टोरी फिल्मीस्टाइलच म्हणावी लागेल. परदेशात शिक्षण घेत असताना सारा आणि सचिन पायलट यांची भेट झाली. या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम असल्याने घरच्‍यांचा कट्टर विरोध होता. मात्र, सचिन पायलट यांनी धर्म, जात आणि सामाजिक बंधने मोडत साराला आपलेसे केले. सचिनने आपल्या कुटुंबीयांना या लग्नासाठी तय्यार केले आणि १५ जानेवारी २००४ मध्ये सारासोबत विवाह केला.

वरुण गांधी आणि यामिनी

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि लोकसभा सदस्य वरुण गांधी यांनी यामिनी रॉय हिच्यासोबत लग्न केलं. यामिनी न्यूयॉर्कमध्ये ग्राफिक्स डिझायनिंगचा कोर्स करत होती त्या दरम्यान वरुण आणि यामिनी यांची भेट न्यूयॉर्कमध्ये झाली होती. दोघांच्या भेटी वाढल्यानंतर या भेटींच रुपांतर प्रेमात झाले. वरुण आणि यामिनी यांनी लग्नाचे नक्की केल्यानंतर मनेकांनी लग्न पूर्ण रिती आणि परंपरेने होईल असे सांगितले. यामिनीच्या कुटुंबानेही तयारी दर्शवली आणि त्यानंतर दोघांचा विवाह पार पडला. यामिनी बंगाली कुटुंबातील आहे. तिचे वडील सुनील रॉय राजनयिक अधिकारी होते, तर आई अरुणा वासुदेव चित्रपट समीक्षक आहे. लग्नामध्ये यामिनीने तिच साडी नेसली होती जी इंदिरा गांधी यांनी मनेका यांना दिली होती.

ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियदर्शनी

ग्वाल्हेर राजघराण्याचे राजे ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियदर्शनी राजे यांची पहिल्यांदा दिल्लीमध्ये भेट झाली. प्रियदर्शनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड मराठा राजघराण्यात झाला. युएसमध्ये शिक्षण पूर्ण करुन परतल्यानंतर प्रियदर्शनी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट झाली. या भेटीच्या तीन वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. ज्योतिरादित्य यांनी आपल्या पहिल्या भेटीतच प्रियदर्शनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियदर्शनी यांचे नाव देशातील सगळ्यात सुंदर राजकुमारीमध्ये घेतले जाते. २०१२मध्ये प्रियदर्शनी यांचा देशातील टॉप ५० सुंदर महिलांमध्ये समावेश करण्‍यात आला होता.

अखिलेश यादव आणि डिंपल

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यांच्या लग्नात सर्वात मोठा अडथळा होता आणि तो म्हणजे मुलायम सिंह यांची नाराजी. डिंपल लखनौ विद्यापिठातून कॉमर्सचे शिक्षण घेत होती तर अखिलेश ऑस्ट्रेलियाहून इंजिनिअरिंगमध्ये मार्स्टर्सची डिग्री करुन परतले होते. डिंपलच्या परिवारातील सदस्य तिच्या निर्णयाचे समर्थन करत होते मात्र, अखिलेशला आपल्या वडीलांना लग्नासाठी तयार करण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागले. अखेर २४ नोव्हेंबर १९९९ रोजी अखिलेश आणि डिंपल यांचा विवाह पार पडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *