कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून या स्त्रीने काय केले पहा,तुम्हीही करून पाहा

Health & Fitness

कांदा कापल्यानंतर प्रत्येक व्यक्ती रडत असतो. काही स्त्रियांना कांदा चिरायचा खूप कंटाळा वाटत असतो. काही घरात कांदा खातच नाहीत, पण तशी घरे आपल्याकडे कमीच आहेत. खाण्याच्या वेळी कांदा आणि आहारात कांदा काही खाणाऱ्यांसाठी जीव की प्राण असतो. पण ह्या ब्लॉगमधून स्त्रियांचे कांदा चिरण्यापासूनचे दुःख काही प्रमाणात कमी करणार आहोत. वरच्या चित्रात तुम्ही पाहत असालच कांदा कापण्यावेळी तिने चष्माच घातला आहे. अमिनो ऑसिड, सल्फोक्सिड ऑसिड आणि अनजाईम ऑसिड याच्यापासून सल्फोनिक ऑसिड तयार होते. यामुळे हे ऑसिड हवेत पसरते. आणि डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात आणि डोळ्यातून पाणी येते. तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही म्हणून हा ब्लॉग. सोपे उपायांनी समस्या सोडवा.

पाणी न येण्यासाठी काय करावे ? 

१) सर्वप्रथम कांद्याची साल काढा, त्याचा टोकाचा भाग आणि खालचा नको असलेला भाग काढून टाका. तो मधोमध कापून त्याचे दोन भाग करा आणि अर्धा तास तो पाण्यात बुडवून ठेवा. मग, आता कांदा चिरताना तुमच्या डोळ्यांची जवजळ होणार नाही.

२) कांद्याची वरील नको असलेली साल काढून तो फ्रिजमध्ये ठेवा. नंतर तो काही वेळाने काढून कापा. डोळे जळजळणार नाहीत. पण कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजला वास येण्याची अधिक शक्यता असते.

३) कांदा योग्य पद्धतीने चिरल्यास तो सोपा वाटतो. त्यासाठी कांद्याचा सर्वप्रथम वरील भाग कट केल्यास तो चिरण्यास सोपा जातो.

शक्य असल्यास वाहत्या पाण्याखाली कांदा कापला तर त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो.

४) कांदा कापल्यानंतर तो काही वेळाने जेवणात वापरायचा असेल तर छोटय़ा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात तो ठेवा. म्हणजे चव बिघडणार नाही आणि वास टिकून राहील.

कांदा कापण्याच्या ठिकाणी मेणबत्ती, लॅम्प लावा.

५) ही गोष्ट महत्वाची आहे. की, कांदा कापताना केव्हाही पंखा बंद ठेवा, डोळ्याला कांदा झोंबणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *