तरुण मुलांना स्वप्नदोष का होतो ? कसे रोखू शकता पहा

Health & Fitness

बरेच पुरुष, विशेषत वयात येणारी मुले स्वप्नदोषाची तक्रार करतात. झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे. यात दोष असा काही नाही व असे होणे अगदी नैसर्गिक आहे. जवळ जवळ सर्व मुलांना वयात येताना हा अनुभव येतो. याने अशक्तपणा, नपुसंकपणा येतो वगैरे भीती अगदी चुकीची आहे. असे काही होत नाही. मात्र चुकीची माहिती व भीती यामुळे ही मुले मन:स्ताप व दुःख सहन करतात. आई वडिलांशी बोलण्याचे धाडस होत नाही व आजूबाजूची मुलेही त्याच गैरसमजाने पोळलेली असतात. ही माहिती योग्य पध्दतीने शाळेतच मिळायला पाहिजे. असाच प्रकार लैंगिक संबंधाची संधी कमी असलेल्या पुरुषांबाबत होऊ शकतो. याने वीर्य कमी होणे वगैरे काही होत नाही, रक्तही कमी होत नाही.

वीर्य परत परत निर्माण होते हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे अज्ञान हेच दु:खाचे मूळ असते. ‘धातू जाणे’ हा पुरुषांच्या भीतीचा आणखी एक विषय आहे. याबद्दल खालील मुद्दे लक्षात ठेवा. बहुतेक वेळा वरील ‘स्वप्नदोष’ हेच त्याचे खरे कारण असते. काही जण उत्तेजित होताना सुरुवातीस लाळेसारखा चिकट पदार्थ येतो त्याला ‘धातू’म्हणतात. खरे म्हणजे हे वीर्य नसते. शरीर संबंध सोपा व्हावा म्हणून निसर्गाने दिलेले वंगण असते. काही पुरुषांच्या लघवीतून फॉस्फेटसारखे क्षार बाहेर पडतात, अशा वेळी लघवी पांढरी धुरकट होते. यालाही गैरसमजाने ‘धातू’ समजले जाते.

वीर्य हे शरीरातून केवळ बाहेर टाकलं जावं म्हणूनच निर्माण होत असतं. शरीराच्या आत त्याचा काहीही उपयोग नसतो. शुक्रजंतूंचं आयुष्यही मर्यादित (२५ ते ४० दिवस) असतं. त्यामुळे वेळोवेळी शुक्रजंतू बाहेर पडू देणंच निसर्गाला अभिप्रेत आहे. म्हणूनच हस्तमैथुनाची प्रेरणा, वयात येताच प्रत्येक व्यक्तीमध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण होते. त्यात गैर, चुकीचं किंवा अपायकारक काहीच नाही. ज्यांचा विवाह झालेला नाही किंवा जे हस्तमैथून करत नाहीत, अशा पुरुषांमध्ये आपोआप झोपेत वीर्यस्खलन होण्याचा प्रकार घडतो. असं घडणं ही एक नॉर्मल घटना आहे. त्यात गैर किंवा अपायकारक काहीच नाही. असं घडावं हेच शरीरधर्माकडून अपेक्षित असतं.

स्वप्नामध्ये वीर्य जाण्याचा स्वप्नदोष असा अत्यंत चुकीचा असा एक शब्द आहे. एकतर हा दोष किंवा विकार नव्हे व दुसरे त्याचे काहीही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. जे बाहेर टाकण्यासाठीच तयार होत ते बाहेर फेकल जाणय योग्य. असं घडाव म्हणून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होण्याची नैसर्गिक घटना सर्वांच्या बाबतीत घडत असते. अर्थातच त्यासाठी औषध किंवा इलाजाची गरज नसते. वयात येणाऱ्या मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये स्वप्नदोष ही एक समस्या होवून जाते. यावर मात करण्यासाठी काही उपाय केले तर यातून सुटका होण्यास मदत होते. स्वप्नदोष ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. त्यासाठी आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध दोन चमचे, 2 चमचे गायीचे तूप यांचे मिश्रण सेवन करा. यामुळे स्वप्नदोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते.

कडूलिंबाचा पाला खाल्यानेही स्वप्नदोष दूर होतो. आवळ्याचा मुरांबा रोज खावा आणि गाजराचा रस प्राशन केला पाहिजे. तुळस ही औषधी आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. तुळशीचे मूळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात. तसेच लसूण ही गुणकारी आहे. लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा. ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा चमचा दूधासोबत घ्यावे. १० ते १२ तुळशीची पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत. रात्री एक लीटर पाण्यात त्रिफळा चूर्ण भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर सुती कापड्याने ते गाळून घेऊन ते प्यावे. त्यामुळे तजेलपणा येतो. यामुळे स्वप्नदोष दूर होतो शिवाय वीर्यही सक्षम होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *