डॉ.निलेश साबळे ला लिहले चाहत्याने पत्र,पहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र आहे तरी काय

Marathi

आजवर तुम्ही सिनेस्टारांवर जिवापाड प्रेम करणारे वेडे चाहते पाहिले असणार. त्यातील बहुतेक वेडे चाहते हिंदीतच पाहायला मिळतात पण हा चाहता काहीसं वेगळाय. याचे नाव माहित नाही पण याने लिहलेले डाॅ.निलेश साबळेसाठीचे पत्र वाचून तुमचा राग अनावर होणार नाहीय.सद्या हे पत्र सोशल साईट्सवरती खुप वायरल होतय.

असे काय आहे या पत्रात तुम्हीच वाचा.

निलेश साबळेंकरिता एका मराठी चाहत्याने लिहिलेले पत्र पुढील प्रमाणे.

य निलेश साबळे ,
सा.न.वि.वि.
सुरवातीला निखळ मनोरंजन प्रेमळ विनोदाचा प्रवास करता करता तुम्ही जग प्रवासाला कधी कसे गेला हे कळलेच नाही बुवा ..
निखळ हास्याचे फवारे उडवत सगळया घराघरातून विनोदी हवानिर्मिती करत तुम्हे अटकेपार झेंडे रोवले खर पण वर्ल्ड टूरचे आपले कार्यक्रम पाहता आता ते अटकेपार गाडलेले झेंडे आता परत काढून आणायची वेळ आता आलीय असच वाटतंय ,बंद करा आता हे पोरचाळे कारण आपले हे जगाच्या पटलावर चाललेले पोरखेळ पाहून आपल्या मातीतून जगप्रवास करावयाची इच्छा असलेली मंडळी जगप्रवासच काय तर शेजारच्या गावाला पण जाणार नाहीत आणि भारतभ्रमण कारवया येणारी मंडळी पण इकडे फिरकणार पण नाहीत , तेव्हा या लवकर नाहीतर आम्ही आता सुषमा स्वराज् यांच्याकडे आपल्या टीमला असाल तसे परत आणावयाचे निवेदन करावयाचे योजत आहोत कारण आपल्या पेक्षा आमच्याकंदील लहान लहान बालके पण शाळेच्या स्नेहसंभेलनात सुंदर अभिनय करून निखळ आनंद निर्मिती करतात एवढं नक्की .आपल्या आपल्या सहकाऱ्यांच्या विकृत अभिनयाने सर्वत्र हस व्हावंयाची वेळ मात्र आलीय
निखळ विनोद सोडून पैसा आणी टि आर पी प्रसिद्धीसाठी चालू असलेली वाटचाल पाहता आता आपला ‘कपिल शर्मा’ होण्याची वेळ जवळ आली आहे असेच भासते आहे,
बोलायचं तर खूप काही आहे पण काही सुचतच नाही ,
कळावे ,
आपलाच एक चाहता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *