या ५ गोष्टी महिला पुरुषांना कधी सांगत नाहीत

OMG

महिला आणि मुली आपल्या आयुष्यातील अनेक राज तसेच ठेवतात. स्त्रीच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं खूपच कठीण असतं. आपला जोडीदार, बॉयफ्रेंड किंवा पतीपासून पासून अनेक खाजगी गोष्टी स्त्रिया लपवत असतात. सोशल मीडियात नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये महिलांना विचारलं गेलं अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या पती पासून किंवा बॉयफ्रेंड पासून आपण लपवू इच्छिता… या सर्व्हेच्या रिपोर्ट मध्ये खालील ५ गोष्टी पुढे आल्या आहेत.

५) आपल्या कुटुंबाशी निगडित माहिती महिला आपला नवरा किंवा बॉयफ्रेंडच्या समोर आपल्या कुटुंबाची प्रतिमा खूप जपतात. आपली बहिण, आई-वडील, भाऊ यांच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट त्या जोडीदारा सोबत शेअर करत नाही. अनेक बाबी सिक्रेट ठेवल्या जातात.

४) एक्सचे किस्से प्रेमामुळेच प्रेमातच महिलेचं अस्तित्व असतं. आपण आयुष्यात येण्यापूर्वीही तिचं आयुष्य असतं. स्वाभाविक पणे त्यात फक्त महिला नाही तर पुरुषही असतात. मात्र जर आपण तिच्या भूतकाळा बाबत विचाराल तर तिला ते सांगणं आवडत नाही. सर्व्हे दरम्यान अधिकाधिक महिलांनी, मुलींनी सांगितलं की, त्या आपल्या एक्सशी निगडित भावनांबद्दल कधीच खरं बोलत नाही. कारण भूतकाळामुळं त्यांना त्यांचा वर्तमानकाळ खराब करायचा नसतो. तर काही महिलांचं म्हणणं होतं की त्यांनी मुद्दाम आपल्या एक्सबद्दलची माहिती वर्तमान सोबती सोबत शेअर केली, जेणेकरून त्याला कळेल की तिच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत.

३) मेकअपच्या गोष्टी महिलांना हे अजिबात आवडत नाही की, त्यांचा नवरा किंवा बॉयफ्रेंड त्यांच्या मेकअप सिक्रेटबद्दल माहिती होवो. त्यामुळं साहजिकच पुरुषांना महिला आपलं सौंदर्य जतन करण्यासाठी काय टीप्स वापरतात हे कळत नाही.

२) मुलींच्या गप्पा आपण हे कधीच जाणून घेऊ शकत नाही की, महिला आपल्या मैत्रिणी बरोबर काय बोलते ते. स्त्री ज्या गोष्टी पुरुषा सोबत शेअर करू शकत नाही किंवा तिला ते आवडत नाही, त्या गोष्टी ती अतिशय सहजपणे आणि मोकळेपणाने आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करते. एवढंच नव्हे तर आपल्या मैत्रिणीच्या खाजगी गोष्टी ती नवरा किंवा बॉयफ्रेंड पासून लपवून ठेवते.

१) आपल्या जुन्या अफेअर बद्दल आपल्याला वाटू शकतं आपल्या आयुष्यात असलेल्या स्त्रीच्या जीवनात तुमच्या असण्याने ती खूप आनंदी आहे. पण आपण चुकूही शकता. कारण स्त्री नेहमी आपल्या भावना लपवते. तिच्या आयुष्यात आपल्या अगोदरही कुणी आलेलं असू शकतं. पण ती ते सांगत नाही. ती असं करते कारण ती आपली प्रतिमे बद्दल खूप काळजी घेते, भयभीत असते. तिला आपली प्रतिमा मलिन व्हावी असं अजिबात वाटत नाही. म्हणून कदाचित तिच्या हातून अनेक चुकाही होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *